शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

संगमनेर तालुक्यातील चारजण कोरोना बाधीत, चारपैकी एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 8:54 PM

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील ०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक जण सोमवारी नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या रुग्णाची नातेवाईक आहे. तर दुसºया व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. 

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील ०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक जण सोमवारी नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या रुग्णाची नातेवाईक आहे. तर दुसºया व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एक जण निमोण येथील आहे. निमोण येथील त्या व्यक्तीचा आज सकाळी येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला. त्यात तो बाधीत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, निमोण येथीलच एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६६ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. इतर २३ अहवालही प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आज सायंकाळी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालया कडून २६ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात हे तिघे बाधित आढळून आले. बाधीत आढळलेली ५७ वर्षीय महिला ही काल नाशिक येथे बाधीत आढळलेल्या रुग्णांची नातेवाईक असून दुसरा ५२ वर्षीय व्यक्ती हा संगमनेर शहरातील रहमत नगर येथील रहिवासी असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली. सध्या, नाशिक येथे बाधीत आढळलेला रुग्ण हा मुळचा निमोण येथील असून त्यांचा मुलगा नाशिक येथे कॉन्स्टेबल असल्याने त्यांना तिकडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

आतापर्यंत एकूण १८७३ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७४१ स्त्राव निगेटिव्ह आले तर ६६ व्यक्ती बाधित असल्याची माहिती त्यांनी दिली.