घारगाव : संगमनेर तालुक्यातील मुळा नदी पात्रातून बेकायदा वाळूउपसा करण-या चार वाहनांवर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली.महसूलच्या पथकाने दादाभाऊ मेंगाळ (रा.जांबुत बु. ता.संगमनेर) यांच्या मालकीचा ट्रक (क्रमांक एम. एच. १२, बी.जे.२२५१), नंदकिशोर विलास तितर (रा.आंबी खालसा ता.संगमनेर) यांच्या मालकीची पिकअप (क्रमांक एम.एच. १४, सी.डी. ०१८०), राहुल बाळासाहेब गुंड (रा.कातळवेढे ता.पारनेर) यांचा डंपर (क्रमांक एम. एच. १६, ए.वाय. ९३७३), संतोष लक्ष्मण पिसाळ (रा.घारगाव ता.संगमनेर) यांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर (क्रमांक एम. एच. १४, ए.व्ही. एक्स. ९१६५) हे चारही वाहने जप्त केली आहेत.मुळा नदीपात्रातून डंपर, ट्रक व ट्रॅक्टरच्या साह्याने वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिबलापूरचे मंडलाधिकारी एम. ए. बुरकुल यांसह कोतवाल मिथुन खोंडे, शशिकांत खोंड, रवींद्र थोरात आदींच्या पथकाने चार वाहने पकडली. ही वाहने मुळा नदी पात्र, आंबी खालसा, खंडोबाचा माळ, १९मैल या वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतली आहेत.
मुळा नदीपात्रातून वाळूउपसा करणारी चार वाहने जप्त : महसूलची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:44 AM