कुलकर्णी यांचा मुलगा प्रतीक कुलकर्णी याचे आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाले आहे. २०१८ साली तो नोकरीच्या शोधात असताना महावितरण कार्यालयात एक जागा भरावयाची आहे, अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार नायब तहसीलदार कुलकर्णी व प्रतीक हे दोघे नगर येथे कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. तेथे त्यांना नितीन धुमाळ भेटला. तुम्ही साहेबांना प्रत्यक्षात भेटलात तर तुमचे काम होणार नाही. मी तुमच्या मुलाचे या कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरीचे काम करून देतो असे धुमाळने सांगितले. नाशिक व मंत्रालयातून ऑर्डर काढून आणावी लागेल. त्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील. कुलकर्णी यांच्याकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. त्यातील दीड लाख लगेच व उर्वरित रक्कम काम झाल्यावर द्यायची असे ठरले. त्यानुसार कुलकर्णी या मुलाच्या नोकरीसाठी पैसे देण्यास तयार झाल्या. त्यानुसार धुमाळ याने त्याच्या एका बँकेचा खाते नंबर दिला. नायब तहसीलदार कुलकर्णी यांनी धुमाळ याच्या बँक खात्यावर कोपरगाव येथील शाखेत १५ मार्च २०१८ ते ३ मे २०१८ या कालावधीत ९ वेळा वेगवेगळी रक्कम मिळून १ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम जमा केली आहे. त्यानंतर नोकरीची ऑर्डर का देत नाही. म्हणून, त्यांनी थेट नगर येथील महावितरण कार्यालय गाठले. तर नितीन धुमाळ या नावाची कोणतीही व्यक्ती आमच्या कार्यालयात कामाला नाही, अशी माहिती मिळाली. त्यावर आपली फसवणूक झाली असल्याचे नायब तहसीलदार कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.
नोकरीच्या आमिषाने नायब तहसीलदारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:20 AM