अहमदनगर : कल्याण येथील व्यापाºयाने कर्जत तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादक शेतकºयांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
या फसवणुकीबाबत कर्जत पोलीस ठाण्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी निलेश दादा सायकर यांनी १८ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अस्लम हुसेन शेख व ताहीरुनिशा असलम शेख (रा. मकबरा बिल्डिंग काळा तलवार मकबरा मज्जित जवळ, कल्याण पश्चिम जि. ठाणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल २०२० मध्ये निलेश सायकर यांच्याकडून अस्लम शेख याने द्राक्षे खरेदी केले होते. शेख याने सायकर यांना सुरवातीला काही रक्कम दिली.
तर उर्वरित ९ लाख ७२ हजार ५०० रुपयांच्या रकमेचा शेख याने ताहीरुनिशा शेख हिच्या बँक खात्याचा धनादेश दिला. सायकर यांनी हा धनादेश बँकेत दिला तेव्हा त्या खात्यावर पैसे नसल्याचे समोर आले. त्यानंतर शेख याला वारंवार संपर्क करुनही त्याने सायकर यांचे पैसे दिले नाही.
तसेच शेख याने कर्जत तालुक्यातील वायसेवाडी येथील दत्तात्रय संभाजी शेटे, करपडी येथील भाऊसाहेब छगन काळे, देशमुखवाडी येथील राजेंद्र मोहिनीराज बरकडे व अखोनी येथील एकनाथ सायकर यांचीही याच पद्धतीने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वीर हे पुढील तपास करत आहेत.