पिंपळगाव माळवी : रोज फाउंडेशन व अभिनव ग्राम विकास मंडळातर्फे जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा तसेच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम राबविला जात आहे. माईंड स्पार्क ॲपद्वारे मुलांना मोफत अभ्यासक्रम शिकविला जाईल, अशी माहिती अभिनवचे समन्वयक संतोष काळे यांनी दिली.
कोरोना काळात विद्यार्थ्यांमध्ये आठ ते दहा महिन्यांचं शैक्षणिक अंतर तयार झालं आहे. ते भरून काढण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. या ॲपद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजी व गणित या विषयांचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यांचा विकास होणार आहे. रोज फाउंडेशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष निसार झाल्टे, जिल्हा समन्वयक राहुल आरू, ‘अभिनव’चे किशोर काळे, प्रकाश कदम, अशोक खोमणे, विशाल पाचरणे, मयुरी साठे, पूजा शर्मा यांनी हा प्रकल्प जिल्हाभर राबविण्याचे नियोजन केले आहे.