कुकाणा : ‘जो येईल पहिल्या दिवशी शाळेत, त्याची कटींग होईल मोफत’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात कुकाण्यामधील शाळेत राबविण्यात आला. पहिल्या दिवशी शाळेत मुलांची उपस्थिती वाढावी याउद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.महाराष्ट्र नाभिक महामंडळ संचलित श्री.संत सेना महाराज ग्रुप व युवक बचत गट कुकाणा यांच्या विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक विद्यार्थ्यांची मोफत कटींग करण्यात आली. नाभिक बांधवाचे हे नाविन्यपूर्ण मोफत सलून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात मंडप देऊन थाटण्यात आले होते. याठिकाणी एकुण दहा खुर्च्यांची व्यवस्था केल्याने एकाच वेळी दहा मुलांच्या कटींग होत होती. सकाळी ११ वाजेपर्यंत शंभरहुन अधिक मुलांच्या कटींग करण्यात आल्या. अक्षय कलेक्शन व जय किसान दुध संकलन केंद्राचे संचालक अरुण फोलाणे यांच्या तर्फे मुलांना वही व पेन देण्यात आले.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उदघाटन माजी सरपंच दौलत देशमुख व सामाजिक कार्यकर्ते केशव दरदंले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.मच्छिंद्र भोसले, कारभारी गोर्डे, उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, बाळासाहेब कचरे, भारत गरड, मुख्याध्यापक सुनिल जाधव, किशोर भंडारी, उमेश सदावर्ते, प्रगत शेतकरी केंद्राचे संचालक संपतलाल मुनोत, विठ्ठल कावरे, बाळासाहेब गर्जे, निलेश काळे आदि मान्यवर उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी संत सेना महाराज ग्रुप व युवक बचत गटाच्या पदाधिकारी व जिल्हा संघटक अशोक पंडित, अनिल पंडित, अर्जुन पंडित, ज्ञानेश्वर लिंगायत, संजय वाघ, शरद कदम, सुभाष पंडित, संजय बोरूडे, गोकुळ वाघमारे, संदीप वाघ, गणेश कदम, किशोर पंडित, सचिन वाघ, सचिन पवार, राजेंद्र गायकवाड,अमोल पंडित, अनिल वाघमारे, भारत कदम, राजेंद्र पंडित यांनी परिश्रम घेतले.
पहिल्या दिवशी शाळेत येणारांची मोफत कटींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 3:52 PM