लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीत मोलमजुरी करून हलाखीचे जीवन जगणाऱ्या गोरगरिबांसमोर पोट भरण्याची चिंता आणि उदरभरणाचे संकट निर्माण झाले होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत सहानुभूतीपूर्वक आणि सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कोल्हार-भगवतीपूर गावातील आपल्या गोरगरीब समाजबांधवांना दिलासा देण्यासाठी मंडळाच्या तरुणांनी लोकवर्गणीतून संकलित झालेला निधी,गावातील व्यक्तींनी दिलेली रोख रक्कम तसेच जीवनावश्यक वस्तू स्वरूपातील असे एकूण सुमारे ७० हजार रुपयांची रक्कम जमा केली. या रकमेतून खरेदी केलेल्या धान्य आणि तांदूळ, साखर, तेल, डाळ, मसाले अशा जीवनावश्यक किराणा वस्तूंचे या मंडळाच्या तरुणांनी वाटप केले. गावात स्वच्छतादूत म्हणून सेवा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना तसेच कोरोना योद्धा असणाऱ्या आशा सेविकांना या मंडळाची ही मदत लाख मोलाची ठरली. नियमांचे पालन करून घरोघर जाऊन जीवनावश्यक वस्तूंच्या सामग्रीचे वाटप या मंडळाने केले. महाशिवरात्र महोत्सव मंडळाचे अक्षय रवींद्र मोरे, वैभव कोळपकर, अक्षय वादे, दिगंबर दळवी, यश जोशी, आयुष मोरे, मंगेश वादे, आदित्य चव्हाण यांनी सामाजिक दायित्वातून राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
200521\img-20210520-wa0064.jpg
गरजू लोकांसाठी धान्य आणि किराणा सामानाचे मोफत वाटप करताना कोल्हार-भगवतीपूर येथील महाशिवरात्र महोत्सव मंडळाचे तरूण कार्येकर्ते