कमिन्सने सामाजिक बांधिलकी जपत मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये नवजीवन संस्थेच्या मदतीने ४० हजारपेक्षा जास्त गरजवंतांना जेवण, किराणा साहित्य, औषधे, कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची मदत केलेली होती. झोपडी कॅन्टिनच्या उभारलेल्या टिफिन सेंटरमधून सिव्हिल हॉस्पिटल, बूथ हॉस्पिटल, मॅक्सकेअर हॉस्पिटल, गॅलेक्सी हॉस्पिटल तसेच एमआयडीसीमधील ॲडोर कंपनीतील कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण तसेच सावेडी अमरधाममधील कोरोना योद्धे यांना चहा, नाश्ता देण्यात येतो.
या टिफिन सेंटरला कमिन्सचे एचआर लीडर आदित्य देसाई, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शिलकुमार जगताप, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक स्वप्नील देशमुख, अहमदनगर महापालिकेचे कोरोना दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान, शहर विभाग पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, महिला बालसंरक्षण कार्यालयाचे सर्जेराव शिरसाठ आदींनी भेट दिली. या उपक्रमास प्रा. अर्चना सदावर्ते, नवजीवनच्या अस्मिता संजय साळवे, व्हीआरडीईतील सेवानिवृत्त अजयकुमार पवार, विश्वमंजिरीचे डॉ. अनिल गुंड यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी कमिन्सच्या अंजली मगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवजीवनचे अमोल खंडागळे, संदीप शिंदे, संगीता पवार, जयंत पाठक हे परिश्रम घेत आहेत.