शिर्डी : मुंबईहून शिर्डीला दिंडी घेऊन येणाऱ्या लाखो साईभक्तांच्या सोयीकरीता स्वतंत्र पालखी मार्गाचा विकास आराखडा तत्काळ तयार करण्याचे निर्देश व तातडीने काम सुरु करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी मंगळवारी ही माहिती दिली.देशाच्या अनेक भागातून पालखी घेऊन पदयात्रेने येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे़ एकट्या मुंबई येथून दरवर्षी शिर्डीला साडेचार ते पाच लाख भाविक पदयात्रेने येतात. यात तरुणांची व महिलांची संख्याही मोठी असते़ बहुतेक पदयात्री मुंबई-आग्रा मार्गे आणि घोटी-शिर्डी मार्गे पालखी घेऊन येतात. त्यामुळे या मार्गावरुन चालणे जिकिरीचे व धोकादायक होते. महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे होणाºया अपघातांमध्ये आजवर अनेक साईभक्तांनी आपला जीव गमावला आहे. नुकत्याच झालेल्या सिन्नर जवळील अपघातात मुंबईतील ५ साईभक्तांचा मृत्यू झावा, तर २१ हून अधिक भक्तांना दुखापत झाली. या पार्श्वभूमीवर अनेक साईभक्तांकडून स्वतंत्र पालखी मार्गाची मागणी होत होती. त्यानुसार डॉ़ हावरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांची भेट घेऊन मुंबई-शिर्डी पालखी मार्गाबाबत पत्राव्दारे विनंती केली होती.>असा राहणार पालखी मार्गप्रस्तावित पालखी मार्गावर उन्हापासून संरक्षणासाठी वृक्षारोपण, मार्गालगत प्रत्येक १५ किलोमीटर अंतरावर एक निवारा शेड्स अशा विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी संस्थानच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्यात येईल. २५० किलोमीटर लांबीचा हा पालखीमार्ग मुंबईहून शिर्डीला जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला राहणार आहे. हा मार्ग १५ फूट रुंदीचा व रस्त्यापेक्षा १ फूट उंचीवर असेल. जेणेकरुन त्यावर वाहने चढू शकणार नाहीत. या पालखीमार्गामुळे मुंबईहून शिर्डीला येणाºया साईभक्तांची पदयात्रा सुलभ व आनंददायी होईल, असा विश्वास डॉ़ हावरे यांनी व्यक्त केला़
मुंबई-शिर्डी पदयात्रींसाठी स्वतंत्र पालखी मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:34 AM