अहमदनगर- केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन-०५ घोषित केल्यानंतर अहमदनगरचे जिल्हाधइकारी राहुल द्विेदी यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनची नवी नियमावली रविवारी रात्री घोषित केली. त्यानुसार पूर्वीपेक्षा फिरण्यासाठी चार तास वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सायंकाळी सातऐवजी रात्री नऊपर्यंत आता फिरायला मोकळीक राहणार आहे. दुकानांची वेळ मात्र सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशीच राहणार आहे. २२ मे पासून सुरू झालेली सलूनची दुकाने मात्र पुन्हा बंद करण्यात आली आहेत. हा नियम ३० जूनपर्यंत लागू असणार आहे.लॉकडाऊन-०४ मध्ये सायंकाळी सात ते सकाळी सात फिरण्यास निर्बंध घालण्यात आले होते. ते आता चार तासांनी शिथील केले असून रात्री नऊपर्यंत फिरण्यास मोकळीक राहणार आहे. पूर्वी सकाळी सातनंतर फिरता येत होते, आता सकाळी पाचपासूनच फिरता येणार आहे. मॉर्निंग वॉकला परवानगी दिल्याने ही वेळ वाढविण्यात आली आहे.----पुनश्च हरि ओमअत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर/ फिरण्यावर रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत निर्बंधसर्व बाजारपेठा /दुकाने सकाळी 9 ते सायं.5 या कालावधीत खुली राहतील.पेट्रोलपंप 24 तास सुरु राहतील.सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाचे ठिकाणी आणि प्रवासा दरम्यान मास्क वापरणे अनिवार्यसार्वजनिक ठिकाणी दारु, पान आणि तंबाखू इत्यादींचे सेवन करण्यास प्रतिबंध---------------------------------हे राहील बंदचसार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील.शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था/ प्रशिक्षण संस्था/ कोचींग क्लासेस इत्यादी बंद राहतील. तथापी आॅनलाईन /दुरस्थ: शिकवणी यास परवानगी राहील.केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्या हवाई प्रवासी वाहतुक व्यतिरिक्त सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील. स्वतंत्र आदेश आणि एसओपीव्दारे अनुमती दिलेल्या व्यतिरिक्त रेल्वे प्रवासी वाहतूक व देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील. सिनेमा हॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्सम ठिकाणे बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्यादीसाठी सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास मनाई राहील.सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील.कटिंग सलून, स्पा, ब्युटीपार्लर बंद राहतील.शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट व आदरातिथ्य सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर/ फिरण्यावर रात्री 9.00 ते सकाळी 5.00 या कालावधीत निर्बंध राहील. 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षा पेक्षा कमी वयाचे मुलांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील.------------------------अहमदनगर जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता वरील प्रमाणे प्रतिबंधीत केलेल्या व्यवहार/कृती/क्रिया व्यतिरिक्त परवानगी असलेल्या सर्व व्यवहार/कृती/क्रिया साठी खालील निदेर्शांचे पालन करणे बंधनकारक असेल. परवानगी दिलेल्या व्यवहार/कृती/क्रिया कोणत्याही शासकीय प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. क्रीडासंकूले, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्यायामासाठी खुले ठेवण्याची परवानगी असेल. तथापी प्रेक्षक वा सामूहिक जमावाला परवानगी असणार नाही. बंदिस्त स्टेडियम मध्ये कोणत्याही क्रिडाविषयक बाबींना परवानगी असणार नाही.शारिरीक व्यायाम व इतर व्यवहार/कृती/क्रियासाठी सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करणे बंधनकारक राहील. सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीस खालील प्रमाणे परवानगी असेल. दुचाकी - 1 स्वार, तीन चाकी - 1 + 2, चार चाकी -1 + 2जिल्हांतर्गत बस सेवेस जास्तीत-जास्त 50 टक्के क्षमतेसह व शारिरीक अंतर आणि स्वच्छता विषयक उपाययोजनांसह परवानगी असेल. सर्व बाजारपेठा /दुकाने सकाळी 9 ते सायं.5 या कालावधीत खुली राहतील. तथापी बाजारपेठा / दुकानांचे ठिकाणी गर्दी आढळल्यास व सामाजिक अंतराचे पालन न झाल्यास स्थानिक प्रशासन त्वरीत अशा बाजारपेठा/ दुकाने बंद करण्याची कार्यवाही करतील. पेट्रोलपंप 24 तास सुरु राहतील.काही विशिष्ट प्रकरणात व्यक्ती व वस्तूंची हालचाल सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट दिशानिदेर्शांनुसार खालील मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. सर्व प्राधिकरणांनी कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादता वैद्यकीय व्यवसायिक, परिचारीका, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांच्या राज्यांतर्गत व आंतरराज्य हालचालीस परवानगी परवानगी द्यावी.व्यक्तींच्या आंतराज्यीय व आंतरजिल्हा हालचाली तसेच अडकलेले मजूर, स्थलांतरीत कामगार, यात्रेकरु, पर्यटक, यांच्या हालचाली एसओपीनुसार नियमित करण्यात याव्यात. श्रमिक विशेष रेल्वेव्दारे आणि समुद्री प्रवास करणा-या व्यक्तींच्या हालचाली एसओपीनुसार नियमित करण्यात याव्यात. देशाबाहेर अडकलेले भारतीय नागरिक आणि परदेशी जाण्यासाठी विशिष्ट व्यक्तींचे, परदेशी नागरिकांचे व भारतीय समुद्री प्रवाशांचे येणे व जाणे एसओपीनुसार नियमित करण्यात यावे.सर्व प्राधिकरणांनी सर्व प्रकारच्या आंतरराज्यीय वस्तू/मालवाहतुक व रिकाम्या ट्रक यांचे वाहतुकीस परवानगी द्यावी.
नगर जिल्ह्यात रात्री नऊपर्यंत फिरायला मोकळीक, सलूनची दुकाने बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 10:04 AM