अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. परंतु मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी दालनातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला निवेदन चिकटवून प्रशासनाला बांगड्यांचा आहेर दिला.नगरमधील शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला दुपारी २ वाजता प्रारंभ झाला. ‘‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अण्णा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे, हमीभाव आमच्या हक्काचा,’’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. जिल्हाधिका-यांनी निवेदन घ्यायला यावे, अशी मागणी आंदोलकांची होती. मात्र, जिल्हाधिकारी निवेदन घ्यायला आले नाहीत़ त्यामुळे आंदोलक संतप्त झाले़ त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाच महिलांनी जिल्हा प्रशासनाला पाच महिलांनी बांगड्यांचा आहेर देत प्रशासनाचा निषेध केला.
अण्णांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : जिल्हा प्रशसनाला बांगड्यांचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 5:26 PM