जनार्दन अकुला चंद्राप्पा (रा.सारोमानगर, रंगारेड्डी, हैदराबाद), राजशेखर अंजय चाकाली (रा.कुडूम करीमनगर, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (रा. बालापूर, रंगारेड्डी, आंध्र प्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (रा. चारमीनार मस्जीद पहाडी शरीफ, आंध्र प्रदेश) व महेश वसंतराव तनपुरे (नवलेनगर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर), असे बोठे याच्यासह अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद) ही महिला आरोपी फरार आहे.
जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट (ता. पारनेर) परिसरात गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र फरार झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी होत होता. अखेर बोठे हा हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहा पोलीस पथकाने पाच दिवस हैदराबाद येथील बिलालनगर परिसरात शोध घेऊन बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत नगर पोलिसांना मुंबई व हैदराबाद पोलिसांनी मदत केल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
.........................
बंद खोलीचा दरवाजा तोडून केली अटक
हैदराबाद येथील गुन्हेगारांचे आश्रयस्थान अशी ओळख असलेल्या बिलालनगर परिसरातील प्रतिभानगर येथील एका हाॅटेलमध्ये बोठे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी हाॅटेलमध्ये दाखल होत शोध घेतला. यावेळी १०९ क्रमांकाच्या खोलीच्या दरवाजाला बाहेरून कुलूप होते. पोलिसांचा संशय बळावला. त्या खोलीचे कुलूप तोडले तेव्हा आतमध्ये बोठे मिळून आला. बोठे हा वेशांतर करून मागील ८० ते ८२ दिवसांपासून बिलालनगर परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे.
......................
बदनामीच्या भीतीपोटी केली हत्या
रेखा जरे या जिवंत राहिल्या तर त्या आपली बदनामी करू शकतात. त्यांच्यामुळे माझ्यावर गुन्हे दाखल होतील, अशी भीती बाळ बोठे याला होती. या भीतीपोटीच त्याने जरे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.