अहमदनगर : आपण प्रत्येक जण समाजाचे काहीतरी देणं लागतो. म्हणूनच सामाजिक दायित्वाचे भान ठेवत सप्रे परिवाराच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. म्हणूनच आज वृक्षारोपण, गरिबांना धान्य वाटप, गाईंना चारा वाटप करण्यात आले, अशी माहिती नवनागापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सागर सप्रे यांनी सांगितले.
गुरुवारी (दि. १०) नवनागापूर ग्रामपंचायत सदस्य सागर सप्रे यांच्या वतीने निसर्ग सृष्टी गोशाळा येथे १६० गाईंना चारा पुरविण्यात आला. वेणू उद्योग समूहाच्या वतीने गोशाळेस चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी देणगी देण्यात आली. तसेच सम्राटनगर, गणेशनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकारातून गोरगरीब कुटुंबांना धान्य व किराणा वाटप करण्यात आले. यावेळी नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, माजी सरपंच दत्तापाटील सप्रे, सदस्य दीपक गीते, स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, विकास जगताप, रोहित रोकडे, अतुल वांढेकर, प्रबोद तुपे, आकाश बेरड, अजित यादव, प्रदीप करांडे, आकाश वांढेकर, सुनील शेवाळे आदी उपस्थित होते.
..............
१० सागर सप्रे
निसर्ग सृष्टी गोशाळेतील गाईंना सप्रे परिवाराच्या वतीने चारा देण्यात आला.