लोणी : लोणी (ता.राहाता) परिसरात शासनाकडून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. मात्र लोणी बाजारपेठेत कुठलेही गांभीर्य लक्षात आलेले दिसून येत नाही. अनेक लोक मोठ्या प्रमाणावर बिनधास्तपणे परिसरात वावरताना दिसून येत आहे. यामुळे बाजारात फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणी परिसरात सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत बाजारपेठा खुल्या करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तर लोणी-संगमनेर रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी गुरूवारी व शनिवारी सकाळी ८ ते ११ यावेळेत परवानगी दिलेली आहे. ही परवानगी देताना फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहे. मात्र या सुचनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तरी पोलीस व प्रशासनाचे आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
लोणी परिसरात फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा; नागरिकांचा बिनधास्त वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 11:19 AM