अहमदनगर : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशीकांत गाडे यांची बिनविरोध निवड झाली.दोन दिवसांपूर्वी संघटनेच्या अध्यक्षपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली होती. उर्वरित कार्यकारिणी मंगळवारी जाहीर झाली. यात राज्यात चार उपाध्यक्षपदे देण्यात आली आहेत. त्यापैकी गाडे यांच्या रूपाने नगरला उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. इतर उपाध्यक्षांमध्ये आमदार अमरसिंह पंडित (बीड), दिनकर पाटील (सांगली), देवराम नाना भोईर (ठाणे) यांचा समावेश आहे. सहकार्यवाहपदी आस्वाद पाटील (रायगड), मोहनराव गायकवाड (नाशिक), रवी देसाई (रत्नागिरी), मदनराव गायकवाड (सोलापूर),महादेव साठे (उस्मानाबाद) अशी निवड करण्यात आली.
राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी गाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:26 AM