अहमदनगर : पारनेर तालुक्यातील करंदी येथील रहिवासी व कवी साहेबराव ठाणगे यांच्या ‘पाऊसपाणी’ या कविता संग्रहाला नुकतेच ‘गदिमा’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
रविवारी (दि. १७) गीतरामायणकार महाकवी ग. दि. माडगुळकर यांच्या माडगुळे (ता. आटपाडी) या गावी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ठाणगे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ काँग्रेस नेते रसिकराज नेते, उल्हासदादा पवार, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पी. डी. पाटील उपस्थित होते. ठाणगे यांचे तीन कविता संग्रह, तीन ललित लेखसंग्रह, एक व्यक्तिचित्रसंग्रह आणि एक चरित्र अशी आठ पुस्तके प्रकाशित झालेली असून, त्यांना यापूर्वी ‘कवयित्री शांता शेळके पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कार, शब्दगंध साहित्य पुरस्कार, पारनेर साहित्यरत्न पुरस्कार’ अशा विविध सोळा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
२१ साहेबराव ठाणगे
साहेबराव ठाणगे यांना ‘गदिमा’ पुरस्कार श्रीपाल सबलीस यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी श्रीनिवास पाटील, उल्हासदादा पवार, रसिकराज नेते, आदी उपस्थित होते.