बुधवारी (दि. २८) दुपारच्या दरम्यान पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह राहुरी पोलीस गस्त घालत असताना हॉटेल मुस्कानवर कंबरेला चाकू लावलेला सराईत गुन्हेगार मालकास शिवीगाळ करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. दुधाळ, आदिनाथ पाखरे, संतोषकुमार राठोड आदींसह राहुरी पोलिसांनी धाव घेतली. तेथे काशिनाथ बबन शिंदे (वय ३५, रा. वैदुवाडी, सावेडी, अहमदनगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे घातक हत्यार आढळून आले. त्याच्यावर अहमदनगर तोफखाना पोलीस ठाण्यात जुगार, पर्यावरण संरक्षण कायदा आणि सार्वजनिक मालमत्ता संरक्षण कायद्यानुसार विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. झडती घेतली असता त्याच्याकडे चाकू आणि तलवार आढळून आल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धाकराव हे पुढील तपास करत आहेत.
सराईत गुन्हेगार हत्यारासह गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:21 AM