शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अहमदनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, सात लाखांची रोकड जप्त, २४ जुगाऱ्यांवर कारवाई

By साहेबराव नरसाळे | Updated: October 29, 2023 18:54 IST

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.

अहमदनगर : नगर शहरातील कोठला येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून २४ जुगाऱ्यांवर कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ७ लाख ३६ हजार ६४० रुपयांची रोकड, एक स्कॉर्पिओ गाडी, विविध प्रकारचे १९ मोबाइल फोन, जुगार खेळण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यावरून आहेर यांनी कोठला येथील दोन खोल्यांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलिस नाईक विजय ठोंबरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, रवींद्र घुंगासे, रणजीत जाधव, रोहित मिसाळ, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, मच्छिंद्र बर्डे, चालक संभाजी कोतकर, अरुण मोरे यांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी कोठला येथील दोन खोलीत गोलाकार बसून हातामध्ये पत्ते घेऊन पैशावर हारजितीचा तिरट जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी या आरोपींवर तोफखाना पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगारविरोधी कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.यांच्यावर झाली कारवाई

गफार वजीर शेख (वय ६०, रा. मुकुंदनगर), राजू मेहबूब शेख (वय ४८, रा. प्रेमदान हाडको नगर), संभाजी महादेव निस्ताने (वय ५०, रा. सर्जेपुरा, अहमदनगर), अँगस्टीन जॉर्ज गोन्साल्विस (वय ३८, रा. तारकपूर), इमाम इब्राहिम पठाण (वय ६०, रा. नेप्तीरोड, केडगाव), बाळासाहेब सुभाष खटके (वय ५०, रा. कायनेटिक चौक, नगर), किरण प्रभाकर पानपाटील (वय ५२, रा. सदर बाजार भिंगार), बाळासाहेब एकनाथ चेंडवाल (वय ५४, रा. गुंजाळी, ता. राहुरी), किरण भगतराम बहुगुणा (वय ४५, रा. फलटण चौकीजवळ, कोठला), बालाजी कृष्णहरी बिजा (वय ४५, रा. सावेडी, नगर), अरबाज खलील शेख (वय २४, रा. कोठला), सुल्तान हनिफ शेख (वय २९, रा. कोठला), जिशान राजू इनामदार (वय ३२, रा. मुकुंदनगर, नगर), निसार अजिज शेख (वय ६०, रा. इदगाह मैदान, ता. शेवगाव), जाहिद रऊफ सय्यद (वय १९, रा. कोठला), राहुल रंगनाथ आल्हाट (वय ३७, रा. पिंपळगाव उजैन, ता. नगर), छबुराव बाबुराव येळवंडे (वय ७०, रा. घोडेगाव, ता. नेवासा), अनिल नारायण फुलारी (वय ४३, रा. दर्गादायरा, मुकुंदनगर), तबरेज इसाक शेख (वय ४२, रा. दर्गादायरा, मुकुंदनगर), रफिक गुलाब शेख (वय ६३, रा. दर्गादायरा, मुकुंदनगर), अख्तर जानमहंमद शेख (वय ४५, रा. झेंडीगेट, नगर), इस्माईल हसन पठाण (वय ६४, रा. गजराजनगर, बुऱ्हाणनगर), अर्शद आयुब शेख (वय ३१, रा. मुकुंदनगर), शुभम विजय देवळालीकर (वय २७, रा. कराचीवालानगर, नगर) हे जुगार खेळताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस