कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण शिवारात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पीकअप टेम्पोसह २ लाख ३६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणाची पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे, पोलीस हवालदार रामकृष्ण खारतोडे, किशोर कुळधर, प्रकाश कुंढारे, गणेश मैड, संभाजी शिंदे, ए. एम. दारकुंडे यांची दोन वेगवेगळे पथक तयार केली.
या पथकाने अमोल मच्छिंद्र आहेर ( रा. वाकडी ता. राहता ), चेतन अरविंद गिरमे ( रा. धारणगाव ता. कोपरगाव ), राजीवसिंह राम आसरेसिंह ( रा. मर्गुपुर पो. तेजीबझार जि. जौनपुर राज्य उत्तप्रदेश ), अंगदकुमार रामपाल बिंद ( रा. रामनगर ता. सहागंज जि. जौनपुर राज्य उत्तरप्रदेश ) या चौघांना अटक करुन त्यांचेकडुन २ लाख ३६ हजार १५० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात एक टाटा कंपनीचा पिकअप टेम्पो ( एम.एच. १७ अे.जी. ७६०१ ) प्लॅस्टीकच्या चार मोठ्या बॅरलमध्ये १ हजार ३० लिटर डिझेल व इतरही वस्तू हस्तगत केल्या आहेत.