करंजी : चाकणहून गॅस सिलेंडर घेऊन परभणी जिल्ह्यातील सेलूकडे जात असलेला ट्रक (क्रमांक एम.एच. ८४४४) करंजी घाटातील वळणावर गुरुवारी पहाटे पलटी झाला. ट्रक चालक शिवाजी रामप्रसाद सोळुखे या अपघातात सुदैवाने बचावला असून याबाबत पाथर्डी पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघात पहाटे घडल्याने गॅस सिलेंडर रस्त्यावर पडलेले होते. वेळेचे भान ठेवून ड्रायव्हरने सिलेंडर गोळा केले. सुदैवाने सिलिंडर फुटला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघाताची खबर चालक सोळुखे याने पोलीस स्टेशनला दिली. घटनेचा तपास पोलीस कॉस्न्टेबल राख करित आहेत.
हायवेवरील पोलीस चौकी बंद
अवघड असण-या करंजी घाटाची मात्र दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावर नियमीत घडणा-या अपघातामुळे प्रशासनाने घाटाखाली हायवे पोलिस चौकी उभा केली. या चौकीवर १४ पोलिस कर्मचारी व १ पीएसआयची नेमणुक आहे. मात्र हीपोलिस चौकी कायम बंदच असल्यामुळे प्रवाशांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.