२६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
येथील श्रीरामनगर भागात कोते गल्लीजवळ कोलकाता येथील गौर मंडल व चुलता सुखदेव मंडल हे चायनीजचा कच्चामाल तयार करतात. २६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कच्चामाल तयार करण्याचे काम चालू होते. गौर मंडल यादरम्यान लघुशंकेसाठी गेला. त्याचवेळी गॅस शेगडी व सिलिंडरने पेट घेतला. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोट झालेल्या गॅस टाकीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या.
गॅस टाकीच्या स्फोटाचा आवाज ऐकून जवळ राहणाऱ्या परिसरातील नागरिकांसह नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव शिंदे, लुकेश शिंदे यांनी धाव घेतली. तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधला. लुकेश शिंदे यांनी उर्वरित चार गॅस टाक्या काढण्यासाठी प्रयत्न केले. काही क्षणात शिर्डी नगरपंचायतीचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाचे विलास लासुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. शिर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आगीचे कारण समजू शकले नाही.
..२७ शिर्डी गॅस टाकी स्फोट
...
ओळी-शिर्डी येथे झालेल्या गॅस टाकीच्या स्फोटानंतर सर्व साहित्य भस्मसात झाले.