शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
4
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
5
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
6
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
7
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
8
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
9
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
10
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
11
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
12
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
13
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
14
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
15
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
16
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
17
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
18
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
19
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
20
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

पुण्यातील मारेकरी आणून गिरे यांची हत्या; मुख्य सूत्रधारासह दोघे अद्याप फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 1:21 PM

शिवसेनेचे कोपरगाव उपतालुका प्रमुख सुरेश गिरे यांची हत्या मुख्य सूत्रधार रवी शेटे व त्याच्या साथीदारांनी पुण्यातील मारेकरी आणून केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी चौघांना अटक केली. अद्याप मुख्य सूत्रधार रवि शेटे, विजू खर्डे हे फरारच आहेत.

अहमदनगर : शिवसेनेचे कोपरगाव उपतालुका प्रमुख सुरेश गिरे यांची हत्या मुख्य सूत्रधार रवी शेटे व त्याच्या साथीदारांनी पुण्यातील मारेकरी आणून केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी चौघांना अटक केली. अद्याप मुख्य सूत्रधार रवि शेटे, विजू खर्डे हे फरारच आहेत.सुरेश गिरे यांची रविवारी (दि.१५) राहत्या घरी भोजडे (ता. कोपरगाव) येथे गोळ्या घालून हत्या झाली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलीस ठाण्यात आरोपी रवि अप्पासाहेब शेटे, विजू खर्डे (दोघेही रा. संवत्सर, ता. कोपरगाव) व अनोळखी ४ अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. रवी शेटे व मयत सुरेश गिरे यांच्या वैमनस्यातून अनेकदा भांडणे झाली. त्यामुळे एकमेकांविरूद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सन २०१२मध्ये रवि शेटे व त्याच्या साथीदारांनी सुरेश गिरे यांचा मित्र बंटी उर्फ विरेश पुंजाहरी शिनगर याचा खून केला. या गुन्ह्यात रवी शेटे व त्याच्या इतर साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. यात शेटे याचे दोन भाऊ जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. परंतु तेव्हापासून रवी शेटे फरार होता. १५ मार्च रोजी शेटे व त्याच्या साथीदारांनी गिरे यांच्या घरी जाऊन पिस्तुलातून गोळ्या झाडत, तसेच कोयत्याने वार करून गिरे यांची हत्या केली.  गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मुख्य आरोपी शेटे याने १५ दिवसांपूर्वीच तळेगाव (जि. पुणे) येथून भाडोत्री मारेकरी आणून हत्येचा नियोजनबद्ध कट केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सखोल तपास केला असता यात नितीन सुधाकर अवचिते (रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे), शरद मुरलीधर साळवे (रा. काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड, पुणे, मूळ रा. गारखेडा, जि. औरंगाबाद), रामदास माधव वलटे (रा. लौकी, ता. कोपरगाव), आकाश मोहन गिरी (रा. खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांची माहिती मिळाली. त्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. यातील आरोपी अवचिते यावर ६ व साळवे यावर ३ गुन्हे पुणे जिल्ह्यात दाखल आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावCrime Newsगुन्हेगारी