चिचोंडी पाटील : मदडगाव (ता.नगर) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी साडेनऊ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष गोरख बबनराव शेडाळे होते. यावेळी नरहरी शेडाळे, तबाजी आठरे, श्रीधर शेडाळे, मनोज येरकळ, डॉ. भरत आठरे आदी उपस्थित होते. सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक सरपंच अनिल शेडाळे यांनी केले. संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन सचिव अतुल भोसले यांनी केले.
मदडगाव सेवा सहकारी संस्थेला २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये १३ लाख १२ हजार १३८ रूपये इतका नफा झाला आहे. या वर्षी संस्था सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब नारायण आठरे यांनी दिली. नरहरी शेडाळे यांनी आभार मानले.