शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

‘गुगल’च्या रचनेवर ‘भूगोल’ तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:27 PM

लोकसंख्येचा निकष पूर्ण करून तुटलेला भाग पुन्हा जोडा

अहमदनगर : लोकसंख्येचा निकष पूर्ण करून तुटलेला भाग पुन्हा जोडा...नव्याने समाविष्ट झालेला भाग पुन्हा जोडा...दूरचा भाग वगळा... भौगोलिक सलगता कायम ठेवा... अशा हरकतींवर तक्रारदारांनी त्यांचे म्हणणे बुधवारी वित्त सचिवांकडे सादर केले. वित्त सचिवांनी म्हणणे ऐकून घेतले, तर रचनेत बदल होणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तिथेच स्पष्ट केले. त्यामुळे एखादा किरकोळ बदल वगळता आहे तशीच प्रभाग रचना एक आॅक्टोबरला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना २७ आॅगस्ट रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली. त्यावर ५ सप्टेंबरपर्यंत ८३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. राज्य शासनाच्या वित्त विभागाचे सचिव राजीवकुमार मित्तल यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, सहायक नगररचना संचालक राजेश पाटील यांची उपस्थिती होती. प्रभाग रचनेवर ८३ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी २२ जणांनी हजेरी लावली. त्यामुळे दुपारी ११ वाजता सुरू झालेली ही सुनावणी दुपारी तीन वाजता संपली.जिल्हाधिका-यांवर नाराजीवित्त आयोगाचे सचिव मित्तल यांनी हरकतदारांचे म्हणणे शांतपणे ऐकले. तसेच अर्जाप्रमाणे बदल करा, अशा विनंत्याही हरकतदार करीत होते. नोंद घेतल्याचे मित्तल सांगत होते. मात्र लोकसंख्येचे गणित जुळत नसल्याने आणि एका प्रभागाची रचना दुरुस्त केली तर त्याचा सर्वच प्रभागाच्या रचनेवर परिणाम होणार असल्याचे सांगत बदल होणार नाही, असे जिल्हाधिकारी सांगत होते. त्यामुळे हरकतदारांचा हिरमोड झाला. प्रभाग रचनेत कोणताही बदल होणार नाही, असेच त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाल्याचे काही हरकतदारांनी माध्यमांना सांगितले.तर कोर्टात जाणारप्रभाग रचनेवर दिलेल्या हरकतींबाबत संबंधित अधिकारी अजिबात म्हणणे ऐकून घेत नाहीत. त्यामुळे प्रभाग रचनेत दुरुस्ती होण्याची शक्यता धूसर आहे. प्रभाग रचनेमुळे नागरिक, मतदार आणि विकासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवरील हरकतींबाबत गरज भासल्यास न्यायालयात याचिका दाखल करू, असे जाहीर आवाहन वसंत लोढा यांनी शासकीय विश्रामगृहासमोर उपस्थित हरकतदारांना केले.‘गुगल’च्या नकाशावर स्पष्टीकरणमहापालिकेची प्रभाग रचना प्रथमच ‘गुगल’वर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी हरकती दाखल केल्या, त्यांना म्हणणे मांडण्यासाठी गुगल नकाशाची स्क्रीनवर सोय करण्यात आली होती. सहायक नगररचना संचालक पाटील यांनी पॉइंटच्या सहाय्याने गुगलवर रचना दाखविली. तसेच हरकतदारांनीही स्क्रीनवर दिसणा-या नकाशावरच आपला भाग कसा तुटला, नव्याने कसा जोडला, हे अधिका-यांना पटवून दिले. हरकतींसाठी प्रथमच अशी व्यवस्था झाली होती.सुनावणी प्रक्रिया ही गोपनीय होती. त्यामुळे त्याचा तपशील सांगता येणार नाही. झालेल्या सुनावणी प्रक्रियेचा अहवाल २४ तारखेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. २८ सप्टेंबरला सर्व हरकतींवरील निर्णय देण्यात येणार आहे. या निर्णयासह १ आॅक्टोबरला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचवेळी कोणाच्या हरकती ग्राह्य धरल्या, ते कळणार आहे.-राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर