यावेळी राष्ट्रवादी क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष घनश्याम सानप, निखिल कुऱ्हाडे, प्रसाद सामलेटी, पोपट लोंढे, अमोल काजळे आदी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात खेळाडूंना प्रशिक्षण केंद्र जाहीर करण्यात आले असून, महाराष्ट्रात २३ जिल्ह्यांना विविध १५ खेळांचे प्रशिक्षण केंद्र म्हणून वर्तमानपत्राद्वारे घोषित करण्यात आले आहे. परंतु अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असून, शिवाय जिल्ह्यात खेळाच्या सरावासाठी चांगली मैदाने, ज्युदो, तिरंदाजी, नेमबाजी, कबड्डी, खो-खो जलतरण आदी विविध खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच छत्रपती पुरस्कार प्राप्त अनेक राष्ट्रीय खेळाडू आहेत. तरीसुद्धा खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात अहमदनगर जिल्ह्याचा समावेश झाला नाही. एकप्रकारे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रावर हा अन्याय आहे. यामुळे जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक, क्रीडा प्रेमी संघटनांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
--------फोटो - ०२क्रीडा
खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातून अहमदनगर जिल्ह्याला डावलण्यात आले असून, जिल्ह्यात खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांना देण्यात आले.