केडगाव : नगर तालुुक्यातील दरेवाडी येथील तुक्कड ओढामध्ये जिल्हा परिषद सेस फंडामधून मंजूर असलेला बंधारा दुरुस्ती आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाकडून अचानक रद्द करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये गेट बंद आंदोलन केले.सरपंच अनिल करांडे म्हणाले, दरेवाडी येथील तुक्ककडओढा मधील बंधारा दुरूस्तीच्या कामास मंजुरी मिळाली . काम सुरू करण्याचा कायार्रंभ आदेश देण्यात आला. मात्र जिल्हा परिषद सदस्याच्या सांगण्यावरून हे काम रद्द करण्यात आल्याचा आरोप करांडे यांनी केला\ यामुळे सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वार येथे जमुन त्यांनी गेट बंद करून आंदोलन सुरू केले .यावेळी दरेवाडी सरपंच अनिल करांडे यांच्यासह पंचायत समिती सदस्य दीपक कार्ले, उपसरपंच भानुदास बेरड, पाणी पुरवठा समिती अद्यक्ष सुभाष बेरड, शिक्षण समिती अद्यक्ष अशोक बेरड, भाऊसाहेब बेरड, नाना करांडे, ग्रा.प.सदस्य नवनाथ करांडे, विजय करांडे, संतोष बनसोडे तसेच नाना करांडे, नितीन बेरड अंकुश सांगळे, भारत करांडे, लहू बेरड, सुनील करांडे प्रेम बेरड बबन बेरड उपस्थित होते. आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वांना बोलावून घेत सदर काम रद्द का करण्यात आले त्यासंबंधी चौकशीचे आदेश दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी आंदोलकांशी चर्चा करून बंधारा दुरुस्ती काम चालू करण्याचे आदेश दिले. निधी उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी आंदोलकांना सांगितले.
दरेवाडी ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेत गेट बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 7:21 PM