लाेकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: शहर व परिसरात धुमस्टाईल व दरोडे टाकून सोने लुटण्याच्या घडना घडत असून, पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मगणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी निवेदानाव्दारे बुधवारी केली.
महापौर वाकळे यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहर व उपनगरात गेल्या दोन दिवसांत चोरीच्या आठ घटना घडल्या आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने लुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नागरिकांकडून पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे. कोरोना महामारीमुळे नागिरक घरात बसून होते. अलिकडेच नागिरक बाहेर पडू लागले असून, चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रात्रीची गस्त वाढून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महापौर वाकळे यांनी केली आहे.