यात ऑनलाइन खरेदीची संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी व्हॉटस्ॲपवर व्हिडिओ कॉल केल्यास कोहिनूरमधील सेल्समन त्यांना व्हर्च्युअली साड्या, कपडे दाखवतील. त्यानुसार ग्राहकांनी आपल्या पसंतीची खरेदी करायची असून, ऑनलाइन पेमेंट केल्यावर सदर खरेदी ग्राहकांना घरपोच पाठविली जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे पूर्ण पालन करीत ग्राहकांना घरबसल्या कोहिनूरमधील दर्जेदार खरेदीचा आनंद मिळावा, यासाठी ही विशेष व्यवस्था केली असल्याची माहिती अश्विन गांधी यांनी दिली.
व्हाॅटस्ॲप व्हिडिओ कॉलिंग केल्यास त्यांना दालनातील सेल्समन सूटिंग, शर्टिंग, साड्या, रेडिमेड विभागातील व्हरायटी दाखवील. ग्राहक अतिशय निवांतपणे घरबसल्या हवे ते कपडे निवडू शकतील. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही व्हर्च्युअल खरेदी ग्राहकांना करता येणार आहे. या नव्या युगातील नव्या सेवेचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन कोहिनूरतर्फे करण्यात आले आहे. (वा.प्र.)