शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

घाटघरला विक्रमी १५ इंच पाऊस

By admin | Published: July 11, 2016 12:33 AM

राहुरी/राजूर : अकोले तालुक्यातील घाटघर, रतनवाडीसह भंडारदरा पाणलोटात व मुळा खोऱ्यातील हरिचंद्रगड परिसराला रविवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला.

राहुरी/राजूर : अकोले तालुक्यातील घाटघर, रतनवाडीसह भंडारदरा पाणलोटात व मुळा खोऱ्यातील हरिचंद्रगड परिसराला रविवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. घाटघर येथे तब्बल १५ इंच पाऊस कोसळल्याने मुळा नदीला मोठा पूर आला आहे. तर भंडारदरा येथे दिवसभरातील १२ तासांत सव्वा पाचइंच पाऊस बरसला. त्यामुळे भंडारदरा धरणात अवघ्या बारा तासांत ९२१ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत धरणातील साठा सव्वाचार टीएमसीपर्यंत (३९ टक्के) पोहोचला. मुळा नदीतून दुपारी ५६ हजार क्युसेकने आवक सुरू असल्याने मुळा धरणाचा साठा सायंकाळी ७ हजार ७०० दशलक्ष घनफूट (३० टक्के) झाला होता. या दोन्ही धरणांच्या पाणलोटातील जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले होते. धरणांच्या पाणलोटात शनिवारपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. मध्यरात्रीनंतर मात्र पावसाचे तांडवच या परिसरात सुरु झाले. नगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर येथे २४ तासांत या मोसमातील सर्वाधिक म्हणजेच ३६० मि.मी. पाऊस बरसला तर त्या खालोखाल रतनवाडी येथे सुमारे सव्वा बारा इंच म्हणजेच ३१५ मि.मी. पाऊस झाला. परिसरातील लहान मोठ्या ओढ्या-नाल्यांना पुराचे स्वरूप आले असून सर्व परिसर जलमय झाला आहे. शिखरस्वामिनी कळसूबाईच्या डोंगररांगांतही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कृष्णावंती या प्रवरेच्या उपनदीसही पूर आला आहे. वाकी येथील लघुपाटबंधारे प्रकल्पावरून सायंकाळी सहा वाजता ३६०० क्युसेकहून अधिक वेगाने पाणी या नदीपात्रात पडत होते. पर्यटकांचे मानबिंदू असलेला रंधा धबधबा रौद्ररूप धारण करू लागला आहे, यामुळे निळवंडे धरणातही नवीन पाण्याची आवक झपाट्याने होत असून या धरणातील पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता १ हजार ३०७ द.ल.घ.फू. इतका झाला होता.राजूर परिसरातही दिवसभर पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्यामुळे ओढे नाले आता वेगाने वाहू लागले आहेत.त्यामुळे तरारून आलेली भात रोपेही पाण्याखाली गेली आहेत. फोपसंडी घाटात रात्री दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती, तर मुळा खोऱ्यातही पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.रविवारी दिवसभरात संपलेल्या २४ तासांत नोंदला गेलेला पाऊस पुढीलप्रमाणे: पांजरे १६२ मि.मी, वाकी १४२ मि.मी, अकोले ८३ मि.मी, निळवंडे ४४ मि.मी, कोतूळ ३३ मि.मी. पर्यटकांचा ओघ सुरू दोन दिवसातं झालेल्या दमदार पावसामुळे आता पर्यटकांची पावले भंडारदरा परिसराकडे वळू लागली आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने रंधा फॉल, तसेच भंडारदरा परिसरात पर्यटकांनी गर्दी गेली होती. पावसाच्या आनंदाने रस्त्याच्या कडेल्या पर्यटक थिरकताना आढळली.