अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य गोपीनाथ भोजणे होते. सरपंच रामनाथ गोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भोजणे, शाळेचे मुख्याध्यापक अरुण कासार, शांताराम ढगे, शिक्षक कृतिशील समूहाचे अध्यक्ष संजय आंबरे, सदस्य अशोक शेटे, सदानंद डोंगरे, दिगंबर फटांगरे, सुनील देशमुख, भास्कर हासे, शांताराम आंबरे, नीलेश देशमुख, गोरक्षनाथ भोकनळ, दीपक थेटे, मंगेश कडलग, प्रतीक दोरगे यासह नामदेव चौधरी, आनंदा चौधरी, देवेंद्र चौधरी, यशवंत चौधरी, लहानू चौधरी, चंद्रभान चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
सोनू-मोनू बँक, सौर अभ्यासिका, डिजिटल शिक्षण, ज्ञानरचनावाद, संगीत कवायत व लेझीम आदी उपक्रम दिवंगत शिक्षक वाडेकर यांनी त्यांचे सहकारी शिक्षक अरुण कासार यांच्या सहकार्याने राबविले होते. वाडेकर यांच्या कार्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराबरोबरच इतरही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या मित्रांनी एकत्र येत छत्रपती संगम शिक्षक कृतिशील समूहाची स्थापना केली आहे.