अहमदनगर : येथील १८ वर्षे वयाच्या तरुणीस फूस लावून आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी वैभव राजेंद्र मुंडलिक (रा. मंगलगेट, नगर) याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना नगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील पूजा पॅलेस येथे जून २०१५ ते १८ एप्रिल २०१६ या कालावधीत घडली. वैभव याने मुलीस लग्नाचे आमिष दाखविले आणि त्यानंतर वारंवार मुलीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सदर तरुणीने लग्नासंबंधी विचारणा केली असता, वैभव मुंडलिक याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित तरुणीने वैभव मुंडलिक याच्याविरुद्ध मंगळवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायदा आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या दोन कायद्यान्वये वैभव मुंडलिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार
By admin | Published: May 18, 2016 11:45 PM