शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

कु-हाडीने घाव घालून पत्नीसह मुलीचा खून; कोपरगाव दुहेरी हत्याकांडाने हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 10:35 AM

कोपरगाव येथील खडकी भागात कु-हाडीने घाव घालून पत्नीसह चिमुरड्या मुलीचा निघृण खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली़ दरम्यान आरोपी पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

ठळक मुद्देरंगपंचमीच्या दिवशी सकाळीच कोपरगावात दुहेरी हत्याकांडआरोपी गणेश भीमराव खरात स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.सुकेशनी ऊर्फ गौरी गणेश खरात व दिदी गणेश खरात (वय ३वर्ष) अशी मयताची नावे आहेत.

कोपरगाव : कोपरगाव येथील खडकी भागात कु-हाडीने घाव घालून पत्नीसह चिमुरड्या मुलीचा निघृण खून केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी साडेसात वाजता घडली. दरम्यान आरोपी पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.गणेश भीमराव खरात हा पत्नी सुकेशनी उर्फ गौरी, तीन वर्षाची मुलगी दिदी, दोन मुले यांच्यासह राहत होता. गणेशची सासू रुख्मिणी सुभाष गवई (वय ६०, रा. कोल्हारा, ता. चिखली, जि. बुलढाणा) या लेकीला माहेरी नेण्यासाठी सोमवारी (दि. ५) कोपरगावात आल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी (दि.६) सकाळी सासू व जावयात भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी पत्नी गेल्या असता गणेशला राग अनावर झाल्यामुळे त्याने कु-हाडीने घाव घातल्याचे सांगण्यात येत आहे. गणेश खरात याने पत्नी गौरी व मुलगी दिदी यांच्या डोक्यात कु-हाडीने घाव घालून त्यांना ठार केले. तर वयोवृद्ध गंभीर जखमी झाली आहे. या कृत्यानंतर आरोपी गणेश खरात हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील नागरिकांचीही आरोपीच्या घराबाहेर मोठी गर्दी जमा झाली आहे. रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी सकाळीच मन सुन्न करणारी ही घटना घडली. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव