याबाबत संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे व सरचिटणीस गोरख खांदवे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे रोजगार गेल्याने हातावर पोट असलेल्या कामगारांचे सध्या मोठे हाल होत आहेत. अनेकांकडे घर भाडे देण्यासाठी पैसे नाहीत, कुटुंबाला काय खाऊ घालावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाने घरेलू कामगार महिलांसाठी मदत जाहीर केली आहे. मात्र नगर जिल्ह्यातील घरेलू कामगार महिलांची कामगार मंडळाकडे गेल्या वर्षभरापासून नोंदणी झालेली नाही. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली मदत त्यांना कशी मिळणार असाही प्रश्न आहे. प्रशासनाने कामगारांची तातडीने नोंदणी सुरू करावी व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
......
रोजगार नसल्याने हातावर पोट असलेल्या कामगारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे सध्या मोठे हाल होत आहेत. शासनाने कामगारांना प्रत्येकी तातडीने दहा हजार रुपयांची मदत द्यावी.
-विलास कराळे, अध्यक्ष जिल्हा श्रमिक कामगार संघटना