निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष कॉम्रेड बाबा आरगडे, उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशिकर, सहचिटणीस लतीफ शेख, विलास कराळे, गणेश आटोळे, सागर बीडकर, आकीब खान, गवतेश नागुलपिल्ली, सतीश भोबाळ, दत्ता गटी, सोमनाथ बहिरवाडे, आकीब सय्यद, राजू शेख, अमिन शेख, अल्तमश शेख आदी उपस्थित होते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय ठप्प झाल्याने रिक्षा चालक अडचणीत आले आहेत. नगर शहरात रिक्षांची मोठी संख्या असल्याने अपेक्षित व्यवसाय होत नाही. अनेक रिक्षा चालकांना कर्जाचे हप्ते भरणेही शक्य होत नाही. त्यामुळे कारवाईला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली. ज्या रिक्षा चालकांचे लॉकडाऊन काळात फिटनेस प्रमाणपत्र इन्शुरन्स अपूर्ण आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाणार नसून त्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. मात्र ज्यांची लॉकडाऊनच्या आधीपासून अपूर्णता आहे, अशा रिक्षा चालकांवर कारवाई करणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवार यांनी यावेळी सांगितले. रिक्षा चालकांना रिक्षा चालविताना बॅच, परवाना, परमिट व गणवेश आवश्यक असल्याचेही यावेळी पवार यांनी सांगितले.
-------
फोटो २१ निवेदन
ओळी- फिटनेस प्रमाणपत्र व इन्शुरन्स थकीत असलेल्या रिक्षांवर कारवाई करू नये, अशी मागणी रिक्षा चालक संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांच्याकडे करण्यात आली.