केवळ नावाने अर्धवेळ असणारी ही परिचारिका रोज सुमारे ७ ते ८ तास काम करते. परंतु तिचा पगार हा मागील तीस वर्षांपूर्वी ५० रुपये महिना होता. तो आज मात्र ३ हजार रुपये महिना एवढाच वाढलेला आहे. महागाईच्या काळात १०० रुपये एवढ्या कमी रोजाने कुणी काम करणार दुसरे कोणी मिळणार नाही. परंतु आज ना उद्या सरकारला जाग येईल आणि आपला उद्धार होईल या धोरणाने ते आजपर्यंत रात्रंदिवस राबत आहेत. मागील वर्षीच्या कोरोना काळात देखील अनेक परिचर महिलांचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळालेला नाही. आजही हे कर्मचारी कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या परिचर महिलांना यावर्षीचा तसेच मागील वर्षीचा प्रोत्साहन भत्ता देण्याची उपाययोजना करावी. तसेच किमान वेतनानुसार त्यांना लवकरात लवकर पगारवाढ करावी आणि यापुढील सर्व वेतन हे त्यांना ऑनलाईन पद्धतीने देण्याची मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, शहराध्यक्ष शहानवाज शेख, कल्पना महाडिक, शालन जाधव, लता कांबळे, सुरेखा जाधव, उषा केदारे, संगीता बोडखे, प्रतिभा सोनवणे, कुमुदिनी वंजारे आदी परिचारिका महिला उपस्थित होत्या. मागणी मान्य न झाल्यास जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
-----------
फोटो मेल
११ जनाधार निवेदन
परिचर महिलांना कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता तसेच वेतनवाढ देण्यात यावी अशी मागणी जनाधार संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.