येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण लोकसंख्या ३२८८५ आहे. यापैकी ४५ वर्षांवरील नागरिकांची लोकसंख्या ९६४५ आहे. त्यापैकी केवळ २८४९ व्यक्तींनी लस घेतली आहे. यामुळे सुमारे ७० टक्के नागरिकांनी पहिला डोसही घेतलेला नाही. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सतरा गावांतील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका यांचा व्हॉटस्ॲप ग्रुप बनवून रोजच्या रोज आलेल्या लसी, प्रत्येक गावांना ठरवून दिलेले लाभार्थी यांची यादी प्रसिद्ध केली जात होती, तरीही ते लाभार्थी लसीकरण करून घेण्यास येत नाहीत. त्यामुळे लसीकरण रखडण्याची शक्यता आहे.
........
लसीकरणानंतर दोन-तीन दिवस आराम करावा लागतो. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. पाऊस सुरू झाला की कामे कमी होतील. त्यावेळी लस घेतली जाईल. तरीही आम्ही ग्रामस्थांना लसीकरणासाठी उद्युक्त करत आहोत.
- सरला चांदर, सरपंच, खिर्डी गणेश