संगमनेर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने संगमनेर शहरात बुधवारपासून (दि.२५) साखळी उपोषणाला करण्यात येत आहे. रविवारी (दि.२९) उपोषणाचे पाचव्या दिवशी महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले.
यावेळी तिघांनी 'परत जा परत जा' विखे-पाटील परत जा' अशी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. तसेच, तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या तिघांना तात्पुरते ताब्यात घेतले. त्यांना सरकारी वाहनातून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
दत्ता ढगे, राम अरगडे, पंकज पडवळ या तिघांनी घोषणाबाजी केली. त्या तिघांनाही शहर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले आहे. संगमनेर बसस्थानकाच्या बाहेर दत्त मंदिराच्या बाहेर सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरू आहे.