मानवी जीवनात जगत असताना सुखाची अपेक्षा प्रत्येकजण करीत असतो. परंतु, सुख न मिळता दुःखच त्याच्या पदरात पडत असते. शाश्वत खरे सुख हवे असेल तर ते सुख गोकुळामध्ये भागवत श्रीकृष्ण भक्तीच्या प्रेमात आहे. श्री नवनाथ कथा, श्रीराम कथा या मानवी जीवाला सुख समाधानकारी आहे. या कथा सर्वश्रेष्ठ आहे. सप्ताहामध्ये काल्याचा प्रसंग समाज एकोपा करणारा आहे. आत्मीकरण, समाजकारण, राजकारण, संसारीकरण आदींनी भगवंत श्रीकृष्ण जीवन चरित्राचे अवलोकन करून त्यांचा आदर्श घेऊन जीवनात यशस्वी वाटचाल करावी, असे निरुपण महाराजांनी केले.
पुणे येथील उद्योजक अविनाश भामरे यांनी भाविकांना प्रसादी भोजन दिले. याप्रसंगी विकास महाराज यादव, भाऊसाहेब महाराज पवार, उमाजी पुणेकर, बबन महाराज सांगळे, कैलास महाराज दुशिंग, अमोल महाराज गाढे, राहुल महाराज चेचरे, सुनील महाराज औताडे, संजय भवार, विष्णू महाराज हांडे, उद्योजक गिरीष थोरात, डॉ.मोहन शिंदे, शंकरराव वाबळे, उषा दगडे, सुरेंद्र दगडे, राजेंद्र लोखंडे, करण ससाणे, सचिन गुजर, मंदा डोळस, भाऊसाहेब डोळस, राजेंद्र कोकणे, पुंजाजी राजनारे आदी उपस्थित होते.