शिर्डीत प्रथमच भाजपाचा नगराध्यक्ष होत असल्याने नगरपंचायत इमारत व नगराध्यक्षांचे दालन फुलांनी सजविण्यात आले होते. वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत गोंदकर यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नगरपंचायतमध्ये आमगन झाले. आ. विखे यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी गोंदकर यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अर्चनाताई कोते, अनिता जगताप, अभय शेळके, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, अॅड. अनिल शेजवळ, रवींद्र गोंदकर, हरिश्चंद्र कोते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नगराध्यक्षांच्या दालनात गोंदकर यांचे मनीषा शिवाजी गोंदकर तसेच अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण केले. यानंतर पुरोहिताच्या मंत्रोच्चारात विखे यांनी गोंदकर यांना नगराध्यक्षांच्या आसनावर विराजमान केले.