आॅनलाइन लोकमतअकोले (अहमदनगर), दि़ १० - तालुक्यातील मन्याळे गावातील भैरवनाथ शंकर जाधव हा शेतकरी आपल्याच शेतातील कोरड्या विहिरी उपोषणला बसला असून राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाकडून या उपोषणाची दखल घेण्यात आली नाही़ त्यामुळे उपोषणाच्या चौथ्या दिवशी परभणी येथील तरुण दत्ता नारायण रेंगे, सरपंच अमित कुऱ्हाडे यांच्या गावकऱ्यांनीही विहिरीत उतरुन उपोषण सुरु केले आहे़मन्याळे येथील शेतकरी भैरवनाथ शंकर जाधव यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी स्वत:च्या कोरड्या विहिरीत उपोषण सुरु केले आहे़ बुधवारी उपोषणाचा चौथा दिवस होता़ या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी येथे दत्ता नारायण रेंगे हा तरुणही मन्याळेत दाखल झाला आहे़ या उपोषणाची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही़ त्यामुळे रेंगे, सरपंच अमित कुऱ्हाडे, बहिरु जाधव, दत्ता गवारी, योगेश जाधव, संदिप बर्डे, साक्षी गवारी, गणेश बर्डे, जयदिप जाधव, बाळू हांडे, निलेश तळेकर, राज गवारी, विकास जाधव, संदीप गवारी, रोहिदास हांडे आदींनी विहिरीत उतरुन उपोषण सुरु केले आहे़ तसेच आज तोडगा न निघाल्यास विहिरीत उतरुन उपोषणात सहभागी होण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी दिला आहे़ दरम्यान प्रशासनापुढील पेच वाढला असून उपोषणास बसणारांची संख्या वाढत चालल्याने विहीर माणसांनी गच्च भरु लागली आहे.
मन्हाळेत गावकरीही उतरले कोरड्या विहिरीत उपोषणाला; प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: May 10, 2017 1:45 PM