संस्थेचे २०२१ हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष असून, त्या निमित्ताने २०० कोटी रुपयांचे ठेवींचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष पोपट नांगरे यांनी सांगितले. संस्थेकडे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२१ अखेर १३५ कोटी ९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. पतसंस्थेच्या ११ शाखांमार्फत व्यावसायिक, गरजू, होतकरू, तसेच महिला व उद्योजक बचतगट यांना १०८ कोटी ६ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे पानमंद यांनी सांगितले. कोरोनासारख्या महामारीच्या काळात संस्थेचा पारदर्शक कारभार, चोख हिशेब, नम्र सेवा, आधुनिकीकरण, आधुनिक बँकिंग सुविधा ग्राहकाला पुरवल्याने व संस्थेने संपादन केलेल्या ठेवीदारांच्या विश्वासाच्या बळावर चालू आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीमध्ये ३३ कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचे संस्थेचे संचालक दत्तात्रय नरसाळे यांनी सांगितले. संस्थेचे थकबाकीचे प्रमाण ६.८३ टक्के इतकेच आहे तर संस्थेचा एकूण व्यवसाय २४३ कोटी १५ लाख रुपयांचा झाल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष सुंबे यांनी सांगितले. (वा.प्र.)
गोरेश्वर पतसंस्थेला ३ कोटींचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:19 AM