अहमदनगर : राज्यातील महिला, मुली, युवती बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणा, महिला आयोग आणि महिला व बालविकास मंत्रीही असंवेदनशील असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वाघ रविवारी नगरला होत्या. यावेळी त्यांनी ‘लोकमत’कार्यालयास सदिच्छा भेट देवून संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, गेल्या १७ महिन्यात ३ हजार ३०० मुली, महिला, युवती राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. रेल्वेमध्ये कुटुंबासह प्रवास करणाºया मुलींवर अत्याचार होत आहेत. पाळणाघरातील चिमुकल्या मुलीही अत्याचाराचे बळी ठरल्या आहेत. कोपर्डी, निंबोडीच्या निर्भयाला अजुनही न्याय मिळालेला नाही. दिल्लीतील निर्भयावर अत्याचार करणाºयांना फाशी झाली असती तर कठुआसारखी प्रकरणे पुन्हा घडली नसती. कोपर्डीतील आरोपींच्या चेहºयावर अपराधाचे मुळीच भाव नव्हते. हा कायद्याचा धाक नसल्याचेच द्योतक आहेत. कोपर्डीसारखे सत्र अद्याप थांबलेले नाही. कायदे खूप आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. पॉस्को, विशाखा हे कायदेही धाब्यावर बसविले आहेत. महिलांची नोकरी सुरक्षित नाही. एसएनडीटीसारख्या विद्यापीठात अद्याप विशाखा समिती कार्यरत नाही. कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.गावागावात सेप्टी आॅडिटराष्ट्रवादी महिला काँग्रेसने गावागावात महिलांसाठीच्या असुरक्षित जागा शोधण्याचे काम सुरू केले आहे. मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील चार गावांमध्ये प्रायोगिक ततत्त्वावर हा प्रयोग राबविला जात आहे. असाच प्रयोग महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे. यामुळे महिलांच्याबाबत गावात सुरक्षित वातावरण तयार होईल. अत्याचाराचे प्रकार घडणार नाहीत. महिलांचा छळ करण्याची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्यासाठी सर्व गावाने, महिलांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
मुख्यमंत्री, बालकल्याण मंत्रीच अकार्यक्षममहिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे याही महिलांच्या सुरक्षेबाबत असंवेदनशील आहेत. महिला आयोगाचे कामही अकार्यक्षम आहे. एकट्या अध्यक्षा नव्हे तर सर्व सदस्य महिलांबाबत संवेदनशील असणे गरजेचे आहे. महिलांबाबतच्या तक्रारी मंत्र्यांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे त्या तक्रारींचे निवारण काय करणार? अशी टीकाही त्यांनी मुंडे यांच्यावर केली. महिलांच्या सुरक्षेचा आढावा, जबाबदारी निश्चितीचे काम महिला व बालकल्याण विभाग पार पाडत नसल्याचेही वाघ म्हणाल्या. राज्याला एखादी महिलाच गृहमंत्री हवी आहे, असे सांगत त्यांनी राज्याचे गृहमंत्रीही अकार्यक्षम असल्याचे सांगत थेट मुख्यमंत्र्यांवरच अप्रत्यक्षपणे टीका केली.