रोज कमवून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्लॅस्टिकच्या वस्तू विक्रेते, भंगार गोळा करणारे अथवा बाजार करून खेळणी विकणारे अनेक बाजारकरू आहेत. कोरोना महामारीमुळे सध्याचा लॉकडाऊन बाजार करणाऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकीत असून कुटुंब अडचणीत सापडले आहे. अनेकांच्या पुढे रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. त्यातच या महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून यात्रा बंद आहेत. या यात्रांमध्ये वेगवेगळ्या वस्तू खेळणी, बांगड्या, प्लॅस्टिकच्या घरगुती वापराच्या वस्तू, कटलरी माल विकणारे यांचा धंदा बंद पडला असून, त्यांच्यापुढे मोठी आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे.
सरकारने फेरीवाल्यांना कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे दरमहा आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सिंधी समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सायकल अथवा मोटारसायकलवर बाजार करून वस्तू विकणे आणि त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
सरकारने त्यांच्या आर्थिक अडचणीचा विचार करून मदत करावी, अशी मागणी सिंधी समाजाचे कार्यकर्ते संजय माखिजा, किशोर छतवाणी, रवींद्र गेरेला, रवीनद्र तलरेजा, मुकेश सिंधवाणी, मनोहरलाल तलरेजा, मुन्नालाल भुतडा, अनिल तलरेजा, चंद्रकांत छतवाणी, सनमुख बठेजा, बबलू आहुजा, बबलूृ सिंधवाणी, जवाहर कुकरेजा, गुरुमुखलाल रामनाणी, बन्सी फेरवाणी, जयकिशन तलरेजा, अनिल लुल्ला, लखन भागवाणी, अशोक भागवाणी, आशिष बठेजा, मनोहरलाल बठेजा, दीपक वलेशा, प्रेमकुमार छतवाणी, हितेश चुग, श्याम सिंधवाणी, गिरीधारीलाल आछडा, सुनील आहुजा, रवींद्र चुग, रवी भागवाणी, जयराम तलरेजा, हिरालाल तलरेजा आदींनी केली आहे.
.............
शिवाजीराव वाघ
श्रीरामपूर : राहाता तालुक्यातील चितळी येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजीराव परशराम वाघ (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे खासगी सचिव उमेश वाघ व चितळीचे माजी उपसरपंच विलासराव व संदीप वाघ यांचे ते वडील होत. राहाता बाजार समितीचे माजी संचालक होते.