सुपा : शेतकऱ्यांच्या दुधाला किमान प्रती लिटरसाठी ३४ रुपयांचा दर देण्याची राज्य शासनाने घोषणा केल्याने सुपा येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी राज्याचे महसूल व दुग्धविकास व पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत या निर्णयाचे स्वागत केले.
पारनेर तालुक्यात मोठ्या संख्येने शेतकरी दूध व्यवसाय करतात. तालुक्यात गावोगावी दुधसंकलन केंद्र आहेत. सरकारच्या या निर्णयाचा थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील शेतकऱ्यांनी पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे व दूध उत्पादकांचे नेते संतोष सरोदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री विखे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालत या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह बापूसाहेब जवक, अनिल जवक, बाळासाहेब जवक, सुखदेव सरोदे, माणिक काळे, कैलास शिंदे, हनुमंत जवक, चांगदेव जवक, दत्तात्रय मगर ,शिवदास मेहत्रे, दादा लोणकर, सोमनाथ सरोदे, आनंद शिंदे, वसंत जवक, मधुकर जवक, रमेश सरोदे, विलास जवक, शंकर जवक, सचिन शिंदे, सतिश शिंदे, प्रताप शिंदे, धिरज शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, दिगंबर लोणकर, अशोक शिंदे, दत्तात्रय जवक, संदीप जवक आदी उपस्थित होते. सुपा परिसरातील दूध व्यवसाय संकटात सापडला होता, आता किमान भाव जाहीर झाला असून तशा सूचना सहकारी व खाजगी दूध संघांना दिल्या असल्याचे पारनेर तालुका सहकारी दूध संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे यांनी सांगितले.