शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

सरकारकडून सहकाराची गळचेपी

By admin | Published: October 10, 2016 12:41 AM

संगमनेर : आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे

संगमनेर : आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. मात्र संगमनेर तालुक्यात सहकारामुळे आर्थिक क्रांती निर्माण झाली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टीमुळे दुष्काळी संगमनेर तालुक्यात संपन्नता आली. संगमनेरच्या सहकारातून निर्माण झालेली आर्थिक क्रांती दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले आहे.संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे लोकविकास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव निंबाळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आ .डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, रामदास वाघ, रणजितसिंह देशमुख, भाऊसाहेब कुटे, शिवाजीराव थोरात, सभापती रावसाहेब नवले, सुरेशराव थोरात, आबासाहेब थोरात, माधव हासे, संतोष हासे आदी उपस्थित होते.निंबाळकर म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांनी दिलेल्या आदर्श विचारांतून संगमनेर तालुका राज्यात अग्रेसर आहे. आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व सहकारी संस्था सुरळीत सुरु असून मॉडेल ठरावे असे काम सहकाराच्या माध्यमातून येथे सुरु आहे. मात्र आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नाशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. हे सरकार उत्पादक व शेतकऱ्यांचे नसून ग्राहक व्यापारी लोकांचे हीत जोपासणारे आहे. रिझर्व्ह बँकेकडून सहकार संपविण्याचे काम सुरु आहे. सहकार क्षेत्र टिकवायचे असेल तर तरुण पिढीला विकासाची माहिती पटवून दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.आ. थोरात म्हणाले की, तालुक्यात पतसंस्थांचेही मोठे जाळे निर्माण झाले असून, १५६ पतसंस्था प्रगतीपथावर आहेत. तालुक्याची अर्थव्यवस्था बदलण्याचे काम सहकारी संस्था व पतसंस्थांच्या माध्यमातून झाले आहे. मधुकर भावे म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यात सहकार वाढवला. सहकाराचे प्रशिक्षण देणारे विद्यापीठ हे संगमनेर तालुक्यात आहे. सहकाराने या तालुक्यात मोठे परिवर्तन झाले असून, सहकारी संस्था, पतसंस्था, व्यापार आणि शेतीचे नियोजन चांगले आहे, असे आ. तांबे म्हणाले. यावेळी अनिल देशमुख, अमित पंडित, आर .एम. कातोरे, संपतराव गोडगे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, सतीश कानवडे, चंद्रकांत कडलग आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक भारत शेलकर, सूत्रसंचालन जिजाबा हासे यांनी केले. भाऊसाहेब खतोडे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)