अहमदनगर : मार्च महिन्याचे धान्य अद्याप जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानावर पोहोचले नाही. पुरवठा विभाग धान्याची तपासणी करूनच आता दुकानावर पाठविणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचे धान्य वाटवास विलंब होत आहे. मात्र धान्याची वाहतूक सुरू झाली असून एक-दोन दिवसात मका, ज्वारी, गहू आणि तांदूळ दुकानात पोहोचणार आहे.
स्वस्त धान्य दुकानात मिळणारे धान्य चांगल्या प्रतीचे नसते अशी नेहमीच ओरड होते. मात्र आता गावागावात कार्यकर्ते जागृत झाल्याने जिल्ह्यातील सर्वच दुकानांमध्ये चांगले धान्य मिळत असल्याचे दिसत आहेत. मंगळवारी जिल्ह्यात काही गावांमध्ये ‘लोकमत’ने पाहणी केली असता मार्च महिन्याचे धान्यच आले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो लाभार्थी धान्याच्या प्रतीक्षेत आहेत.
-----------------------
काय मिळणार दुकानावर?
शेवगाव, नेवासा या दोन तालुक्यात ज्वारी वाटप होणार आहे, तर कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नगर आणि पाथर्डी तालुक्यात मका वाटप केला जाणार आहे. जिथे मका, ज्वारी मिळणार आहे, तिथे गहू कमी करण्यात आला आहे. जिल्ह्यात खरेदी केलेला मका आणि जळगाव जिल्ह्यातून आलेली ज्वारी दिली जाणार आहे.
----
स्वस्त धान्य दुकानावर मिळणाऱ्या धान्याचे वाटप करण्यापूर्वी त्याची पुरवठा विभागाकडून तपासणी केली जात आहे. चांगल्या प्रतीचे धान्य लाभार्थ्यांना मिळावे, यासाठी तपासणी केली जाणार आहे. त्यामुळेच धान्य वितरणास विलंब झाला आहे. मात्र धान्याची वाहतूक सुरू झाली असून एक-दोन दिवसात सर्व स्वस्त धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचणार आहे.
-जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी
----------
असे आहेत लाभार्थी
अंत्योदय योजना-८८,६१८
प्राधान्य कुटुंब-६,०५,५२४
एकूण-६,९४,१४२
---
डमी
नेट फोटो
०२ रेशन ग्रेन डमी
पिपिल-२