चांदा : बऱ्हाणपूरच्या (ता. नेवासा) ग्रामपंचायत सदस्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. कांगोनी फाटा- बऱ्हाणपूर रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबले असता, दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. जखमी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
संकेत भानुदास चव्हाण (वय २५, रा. बऱ्हाणपूर, ता. नेवासा) असे जखमीचे नाव आहे.
संकेत चव्हाण हे मंगळवारी (दि.१५) रात्री साडेनऊच्या सुमारास कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूरकडे रस्त्याने चालले होते. ते एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. चव्हाण यांच्या पोटावर, हातावर, पायावर गोळ्या लागल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नगर येथे हलविण्यात आले.
याप्रकरणी भानुदास जगन्नाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब भाऊसाहेब हापसे व विजय विलास भारशंकर (दोघे रा. बऱ्हाणपूर) यांच्यावर शनिशिंगणापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
---
१६ संतोष चव्हाण