अहमदनगर - पुणतांबा येथील पंधरा ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा आज पुणतांबा येथील ग्राम सचिवालयमध्ये पुणतांबा गावचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभा सुरू होण्या अगोदरच विकास आघाडीचे अध्यक्ष विठ्लराव जाधव यांनी सतरा कोटी रुपयांच्या जलस्वराज्य टप्पा दोन योजनेतील राहिलेल्या त्रुटी बाबत ठेकेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित राहत नाही, तसेच याबाबत वेगळी ग्रामसभा घेत याची जबाबदारी कोणावर टाकणार? असे प्रश्न उपस्थित केला. ठेकेदार, अधिकारी यांना पाठीशी घालण्याचे काम समितीने करू नये आणि असे जर होत असेल तर आम्ही या ग्रामसभेचा त्याग करतो असे सांगत व निषेधाच्या घोषणा देत ग्रामसभेचा त्याग केला. आठ दिवसात या योजनेच्या संपूर्ण चौकशीसाठी आंदोलन करू. चौकशीत दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्या वर गुन्हे दाखल करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
Gram Sabha: पुणतांबा ग्रामस्थांचा ग्रामसभेतून सभात्याग
By सुदाम देशमुख | Published: August 23, 2022 12:02 PM