अहमदनगर : मोहरम व गणेशोत्सवादरम्यान शहरात शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विक्रम राठोड, सचिन जगताप, श्रीपाद छिंदम यांच्यासह ३०० जणांना ११ ते २३ सप्टेंबरपर्यंत नगर शहर हद्दीत प्रवेश बंदी केली आहे़ जिल्ह्यातील एकूण ५०० जणांवर कलम १४४ (२) प्रमाणे प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार ही कारवाई करण्यात आली आहे़ शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगाव येथे दंगल करणारे, पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून तोडफोड करणारे यासह सराईत गुन्हेगार, विविध गुन्ह्यात सहभाग असलेल्यांवर उत्सव काळात शहरबंदीची कारवाई करण्यात आली आहे़ नगर शहर हद्दीतून आमदार पुत्र सचिन जगताप, माजी आमदार पुत्र विक्रम राठोड, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यासह बिरजू राजू जाधव, गजेंद्र सैंदर, महेश उर्फ बिट्ट्या निकम, दिनेश सैंदर, रशिद अब्दुल शेख उर्फ दंडा, घनश्याम बोडखे, विकास खरपुडे, अदिनाथ उर्फ लक्ष्मण जाधव, अभिषेक भोसले, दुर्गाजी शिंदे, अनिल सैंदर, प्रकाश सैंदर, शेख कलिम रफिक, शेख तनवीर, मोहसीन शेख, अंकुश चत्तर, करण उर्फ बंटी ढापसे, भावेश उर्फ बंटी राऊत, सागर डोंगरे, बंटी उर्फ विष्णूपंत खैरे, सचिन शिंदे, अशोक दहिफळे, गणेश कोतकर, विजय पटारे, दत्तात्रय नागापुरे, जावेद शेख, नंदू बोराटे, विजय गवळी, अनिल पवार, सुरज जाधव, करण ससे, टकलू मुक्तार शेख, अजहर मंजूर शेख, संतोष सूर्यवंशी, परशूराम उर्फ परेश खराडे, शिवाजी अनभुले, भाऊसाहेब कराळे आदींचा कारवाई केलेल्यांत समावेश आहे. उत्सव काळात नगर शहरात प्रवेश बंदी करण्यात आलेल्यांमध्ये विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे़ केडगाव दंगल आणि अधीक्षक कार्यालयात तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांचाही यामध्ये समावेश आहे़ या कारवाईतून पक्षाचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व विद्यमान नगरसेवकांना वगळण्यात आले आहे.साडेतीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईउत्सव काळातील दक्षता म्हणून पोलिसांनी विविध कलमातंर्गत जिल्ह्यातील साडेतीन हजार पेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे़ यामध्ये बहुतांशी जणांना नोटीस देणे, गुन्हेगारी कृत्य करणार नाही याचे हमीपत्र लिहून घेणे अशा स्वरूपाच्या कारवाईचा समावेश आहे.
आजी-माजी आमदार पुत्रांना शहरबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:51 AM
मोहरम व गणेशोत्सवादरम्यान शहरात शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विक्रम राठोड, सचिन जगताप, श्रीपाद छिंदम यांच्यासह ३०० जणांना ११ ते २३ सप्टेंबरपर्यंत नगर शहर हद्दीत प्रवेश बंदी केली आहे़ जिल्ह्यातील एकूण ५०० जणांवर कलम १४४ (२) प्रमाणे प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे नगर शहरातील ३०० तर जिल्हाभरातील ५०० जण तडीपार