शासनाने रिक्षाचालकांना अनुदान देण्याचे जाहीर केल्यानंतर रिक्षाचालकांचे काही प्रतिनिधी व संघटना यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी परिवहन कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. यावर उपायुक्त दराडे यांनी प्रसिद्धीपत्र काढून सांगितले आहे की, राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान सरळपणे त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याबाबत पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत सुरू आहे. अनुदानाबाबत ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू करतेवेळी सर्व संघटना व रिक्षाचालक यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे.
-------------------------------
जिल्ह्यात साडेनऊ हजार रिक्षाचालक
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद आहेत. या काळात दुर्बल घटकांना शासनाने मदतीची घोषणा केली असून, परवानाधारक रिक्षाचालकांनाही प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यात ९ हजार ६०६ परवानाधारक रिक्षाचालक आहेत.